breaking-newsराष्ट्रिय

राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या चष्म्याचा २१ ऑगस्टला ब्रिटनमध्ये लिलाव

नवी दिल्ली – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी परिधान केलेल्या सोन्याच्या कडा असलेल्या चष्म्याचा लिलाव ब्रिटनमध्ये २१ ऑगस्टला ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. महात्मा गांधी यांनी १९०० साली हा चष्मा घातला होता. त्यानंतर त्यांनी ब्रिटनमधील एका कुटुंबाला हा चष्मा भेट म्हणून दिला होता. या चष्म्याची अंदाजे किंमत ९.७९ ते १४.६८ लाख रुपये आहे.

दक्षिण-पश्चिमी इंग्लंडच्या उपनगरातील हनहम येथील कंपनी ईस्ट ब्रिस्टल ऑक्शंसने यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, इंग्लंडमधील एका वृद्ध विक्रेत्याकडे गांधीजींचे हे चष्मे होते. या विक्रेत्याच्या काकांना महात्मा गांधींनी स्वत: हे चष्मे भेट दिले होते. ब्रिटीश पेट्रोलियममध्ये काम करत असताना १९१०-३०मध्ये गांधीजींनी त्यांना ही भेट दिली होती. या चष्म्याला मोठा सुवर्ण इतिहास आहे. महात्मा गांधींच्या चष्म्याच्या जोडीचा २१ ऑगस्टला ऑनलाईन पद्धतीने लिलाव होत असून अनेक ग्राहकांना या चष्म्याने आकर्षित केले आहे. आताच सहा हजार पाउंडला या चष्म्याची ऑनलाईन मागणी करण्यात आली असल्याचे लिलावकर्त्या कंपनीच्या अँडी स्टो यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button