breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रावेत जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यास महासभेची मान्यता

या कामाचे लेखार्शिष निर्मिती व 50 कोटी रुपये प्रशासकीय मान्यता देण्यात आली

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढीव पाणी पुरवठा करण्याची गरज भागविणे आवश्यक आहे. त्याकरिता रावेत येथील अशुध्द जलउपसा केंद्रातील पंपींग मशिनरीची क्षमता वाढविणे आणि आनुंषगिक कामे करणे, तसेच सेक्टर क्रमांक 23 मधील जलशुध्दीकरण केंद्राची देखील क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्या कामाच्या सुमारे 50 कोटी खर्चास आज (सोमवार) महापालिकेच्या महासभेने प्रशासकीय मान्यता दिली.

महापालिकेची जानेवारी महिन्याची आज महासभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापाैर उषा ढोरे होत्या. शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील वाढत्या पाण्याची गरज लक्षात घेवून अतिरिक्त जलउपसा करणे गरजेचे राहणार आहे. त्यामुळे रावेत येथील अशुध्द जलउपसा केंद्र येथून प्रतिदिन 100 दश लक्ष लिटर अतिरिक्त जलउपसा करता यावा. याकरिता रावेत पंपगृहामधील पंपींग मशिनरीची क्षमता वाढविणे, आनुषंगिक कामे करणे, सेक्टर 23 मधील जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणात एकूण 185.67 द.ल.घ.मी. पाण्याचे आरक्षण मजूर आहे. सध्यस्थितीला 480 एम.एल.डी पाणी उपलब्ध होते. महापालिकेची पाणी उचलणे व शुध्दीकरण करण्याची क्षमता 428 एम.एल.डी एवढी आहे. ओव्हर लोडींग करुन 480 एम.एल.डी इतके पाणी उचलले जाते. या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला तर मर्यादित क्षमतेमुळे महापालिकेस जादा पाणी उचलता येत नाही. याकरिता एकूण पाणी उचलणे आणि शुध्दीकरण क्षमतेत वाढ केल्यास ज्या वर्षी जादा पाऊस होईल. त्या वर्षी जास्त पाणी उचलणे शक्य होणार आहे. त्यानंतर पंपींग मशिनरी व जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता वाढविण्याचे कामे तातडीने हाती घेता येतील.

महापालिकेच्या सन 2019-2020 आर्थिक वर्षात विशेष योजना या लेखा शिर्षाखाली रावेतच्या पंपींग मशिनरी व सेक्टर 23 जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता वाढविणे, या कामाचा अंदाजपत्रकात सुमारे 50 कोटीचे खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हा प्रस्ताव महापालिकेच्या महासभेत नियम क्रमांक 1 नुसार दाखल करण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button