breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

बैलगाड़ी पर, खा खा कर हिचकोले,धूप में जाकर डाली खटियावर बिग बी करतायत आराम.


नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ सिनेमाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर नुकतच प्रदर्शित करण्यात आलं. स्वतः बिग बी आणि नागराज मंजुळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हे पोस्टर शेअर केलं. यासोबतच चित्रपटाच्या पोस्टर सोबतच अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाच्या शुटच्या वेळेसचे काही क्लिकस शेअर केले आहेत.

या क्लिक्समध्ये काही गावाकडचे आठवणी अमिताभ शुटच्या निमित्ताने एन्जॉय करत असल्याचं दिसून येत आहे..यातल्या पहिल्या फोटोत अमिताभ एका बसमध्ये बसलेले आहेत..बसच्या खिडकीतून बाहेर बघत कोणत तरी ध्येय मनात ठरवून प्रवासाला निघालेत असं वाटत.

दुस-या फोटोमध्ये ते एका बैलगाडीत बसलेले दिसतायत तर, दुसरीकडे ते गावाकडच्या एका बाजेच्या खाटेवर निवांत पडल्याचा फोटो पोस्ट करत …”बैलगाड़ी पर,
खा खा कर हिचकोले, धूप में जाकर डाली खटिया,कुछ आराम तो हो ले” असं कॅप्शन देत त्यांनी खुप दिवसांनी बैलगाडीत बसल्याचा आणि गावच्या खाटेवर झोपण्याचा आनंद मिळाला हे समाधानही त्यांनी व्यक्त केलं …

‘स्लम सॉकर’ (Slum Soccer) एनजीओ चालवणारे सामाजिक कार्यकर्ते विकास बरसे यांच्या जीवनावर हा सिनेमा बेतलेला आहे. सिनेमाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे करत असून या सिनेमातून ते बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button