breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रावेतमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

पिंपरी – महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने मंगळवारी (दि.12) रावेत, किवळे येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.

‘ब’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 16 येथील रावेत व किवळे येथे अनधिकृत बांधकामे केली होती. या बांधकामांवर अतिक्रमण विभागाने मंगळवारी धडक कारवाई केली. यामध्ये आरसीसी दोन, पत्राशेड एक असे एकूण तीन बांधकामे 6027.64 चौरस फुट बांधकाम (560.19 चौरस मीटर ) व 165  मीटर अनधिकृत सिंमाभित पाडण्यात आली. कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता केशवकुमार फुटाणे, कनिष्ठ अभियंता व बीट निरीक्षक यांचे पथकाने एक जेसीबी, 10 मजूर यांच्या सहाय्याने ही कारवाई केली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button