breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रावसाहेब दानवे स्वतःला प्रतिमुख्यमंत्री समजतात – माजी आमदार कैलास गोरणत्याल

जालना – खासदार रावसाहेब दानवे हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असून ते स्वत:ला प्रतिमुख्यमंत्री समजतात. त्यांनी आपल्या लायकीनुसार काम करावे. टँकर तर माझे नगरसेवक देखील लाऊ शकतात, हे काम त्यांना शोभत नाही, अशी बोचरी टीका काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरणत्याल यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केली.

जालना शहरात पाणीप्रश्नावरून राजकारण तापलं असून शनिवारी खासदार दानवे यांनी जालना शहरातील पाणीटंचाई संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन शहरात 61 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची सूचना केली. शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी केंद्राचे आणि राज्याचे मिळून 400 कोटी रुपये निधी देऊन सुद्धा जालना नगर पालिका नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरत असल्याच आरोप केला होता. तसेच अंतर्गत जलवाहिनीचे 40 टक्के काम नियमबाह्य झाले असून त्याची चौकशी लावणार असल्याचं जाहीर केलं होतं.

यासंदर्भात माजी आमदार कैलास गोरणत्याल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दानवेना प्रत्युत्तर दिलं. जालना शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी आम्हाला कोणत्याच लोकप्रतिनिधीने मदत केली नाही. अंतर्गत जलववाहिनीच्या कामात 40 टक्के अनियमिटतेचा आरोप फेटाळून लावत तो अभियंत्यांचा अधिकार असल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, खासदार दानवे यांनी पाणीप्रश्नावर आयोजित बैठकीत महिला नगराध्यक्षाना डावलने म्हणजे महिलांचा आणि समस्त जालनेकरांचा अपमान असून नगर पालिकेच्यावतीने आम्ही त्यांचं निषेध करतो,असेही गोरणत्याल म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button