breaking-newsराष्ट्रिय

राफेल घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करा; यशवंत सिन्हांची सुप्रीम कोर्टात याचिका

राफेल करारात घोटाळा झाला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारी याचिका यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि प्रशांत भूषण यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयला तपास करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

राफेल करारावरुन काँग्रेसने मोदी सरकारला घेरले असून राफेल करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसपाठोपाठ आता माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी यांनी देखील राफेल करारावरुन मोदी सरकारच्या अडचणीत भर टाकली आहे. अरुण शौरी, यशवंत सिन्हा आणि प्रशांत भूषण यांनी बुधवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. राफेल करारात भ्रष्टाचार झाला असून या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. सीबीआयने या प्रकरणात गुन्हा दाखल करुन तपास करावा आणि हा तपास सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली व्हावा, असेही याचिकेत म्हटले आहे.

प्रशांत भूषण आणि अरुण शौरी यांनी ४ ऑक्टोबर रोजी सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांची भेट घेतली होती. राफेल करारासंदर्भात गुन्हा दाखल करावा, यासाठी त्यांनी सीबीआयला लेखी तक्रार अर्ज दिला होता. मात्र, या अर्जाबाबत अद्याप कोणताही निर्णन न झाल्याने या तिघांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

प्रशांत भूषण यांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना राफेल करार हा भारताच्या संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा दावा केला. या संपूर्ण प्रकरणाचा सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली तपास झाला पाहिजे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

दरम्यान, सुप्रीम कोर्टात राफेल कराराप्रकरणी आधीपासूनच दोन याचिका दाखल आहेत. एम. एल. शर्मा आणि विनित धांदा यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकांवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने सरकारने करारातील तांत्रिकबाबींचा तपशील सादर न करा फक्त निर्णय प्रक्रियेचा तपाशील बंद लिफाफ्यात चार आठवड्यात सादर करावा, असे आदेश दिले होते. याप्रकरणी ३१ ऑक्टोबर रोजी सुनावणी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button