breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रात्रभर चार्जिंग केलेल्या मोबाईलच्या बॅटरीचा घरात स्फोट ; लहान मुलासह पाच जण गंभीर जखमी

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पिंपरीतील  कासारवाडीत रात्रभर घरामध्ये चार्जिंगला लावलेल्या मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला. त्यामुळे घराला आग लागली. या आगीत बिरादार कुटुंबातील 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (सोमवारी) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश असून जखमींना उपचारासाठी तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पिंपरीतील कासारवाडी येथील बिरादार कुटुंबातील सदस्याने झोपताना मोबाईल चार्जिंगला लावला होता. रात्रभर मोबाईल चार्जिंग सुरुच होतं.  रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावून ठेवणं धोक्याचं आहे. त्याचीच प्रचिती  बिरादार कुटुंबाला आली. कुटुंब झोपेत असताना चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाला. सर्वजण झोपेत असल्याने नेमकं काय झालंय कोणालाच कळलं नाही. या स्फोटाने घराला आग लागली. त्यामुळे या आगीत 5 जण जखमी झाले आहेत. जखमींवर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कासारवाडीत केशव नगरमधील गुरुनाथ कॉलनीत ही घटना घडली. बिरादार कुटुंबातील सदस्य झोपलेले असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत शोभा बिरादार, विजय जाधव , गणेश बिरादार, शुभम बिरादार, देवांश बिरादार हे जखमी झाले आहेत. त्यांना वायसीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आगीमध्ये चार्जिंगला लावलेला मोबाईल आणि घरातील इतर वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

     

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button