breaking-newsमुंबई

राज-उद्धव यांची ‘मातोश्री’वर भेट, कारण…..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी संध्याकाळी मातोश्रीवर पोहोचले आणि राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली. मुलगा अमित ठाकरेच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी म्हणून राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. येत्या २७ जानेवारीला अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे विवाहबंधनात अडकणार आहेत. मुंबईतल्या सेंट रेजिस या आलिशान ठिकाणी अमित आणि मितालीचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

गेल्याच वर्षी डिसेंबर महिन्यात या दोघांचाही साखरपुडा पार पडला. उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाला लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी म्हणून राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. शिवसेना आणि मनसेमध्ये राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक नाते मात्र कायम आहे.

नव्यावर्षाच्या पहिल्याच दिवशी एक जानेवारीला राज ठाकरेंनी सपत्नीक सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले व अमित ठाकरेची लग्नपत्रिका बाप्पाचरणी अर्पण करत आशिर्वाद घेतले. त्यानंतर राज ठाकरे यांनी उद्योगपती रतन टाटा यांनी पहिलं आमंत्रण दिलं.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button