breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मेट्रोच्या क्रेन दुर्घटनेमुळे बसमधील प्रवाशांवर ‘संक्रांत’ (पहा व्हिडिओ)

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पुणे महामेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट मार्गाच्या कामात मेट्रोचा क्रेन कोसळताना पुणे-मुंबई महामार्गावरून जात असलेली खासगी बस सहिसलामत मार्गस्त झाल्याचे सीसीटीव्ही कॅमेरॅत चित्रीत झाले आहे. हा क्रेन बसवर कोसळला असता तर बसमधील 20 ते 25 प्रवाशांवर संक्रांत कोसळली असती. त्यामुळे मेट्रोचे नियोजनशुन्य कामकाज पुन्हा चव्हाट्यावर आले आहे.

मेट्रोचे पिलर उभे करताना आज शनिवारी (दि. 5) अचानक दुपारी अडीचच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावर क्रेन कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मेट्रोने नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. त्यामुळे पुण्याहून पिंपरीकडे येणा-या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यात जीवीत हाणी झाली नसली तरी क्रेन कोसळण्यापूर्वी अवघ्या काही सेकंदातच एक खासगी बस प्रवाशांना घेऊन मार्गस्त होत होती. क्रेन जमीनीवर कोसळण्यापूर्वी काही सेकंदात बस पुढे गेल्याने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत. अन्यथा, मेट्रोच्या नियोजनशून्य कामकाजामुळे निष्पाप प्रवाशांवर आज संक्रांत कोसळली असती. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button