breaking-newsपुणे

राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ;

पुणे – राज्यातील ९५ भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकाºयांच्या बदल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री उशिरा केल्या. पुणे अणि पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक महत्त्वाच्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. प्रामुख्याने पुणे शहर पोलीस उपायुक्त बसवराज तेली, पुणे शहर पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे, पुणे शहर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पुणे पोलीस अधीक्षक (गुन्हे अन्वेषण) प्रसाद अक्कानवरू, पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पुणे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, पुणे शहर पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, पुणे शहर पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांची पुणे शहरातून राज्यातील विविध शहर आणि जिल्ह्यामध्ये बदली करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त   विनायक ढाकणे, पुणे शहर पोलीस उपायुक्त बी. जी. गायकर, पुणे शहर पोलीस उपायुक्त संजय बाविस्कर, पुणे विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेशकुमार मेकला, पुणे शहर सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, पुणे शहर पोलीस आयुक्त बच्चन सिंग, पुणे शहर पोलीस आयुक्त मंगेश शिंदे, पुणे शहर पोलीस आयुक्त प्रकाश गायकवाड, पुणे शहर पोलीस आयुक्त स्मार्तना एस. पाटील, पुणे शहर पोलीस आयुक्त सुहास पी. बावचे,  पुणे शहर पोलीस आयुक्त शिरीष सरदेशपांडे, पुणे दहशतवादविरोधी पथक पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, पुणे राज्य राखीव पोलीस दल गट १ समादेशक ए. एच. चावरिया, पुणे राज्य राखीव पोलीस दल गट २ समादेशक एम. रामकुमार, पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस उपमहानिरीक्षक डी. वाय. मंडलिक, पुणे शहर सहपोलीस आयुक्त एस. टी. बोडखे आदींची पुणे शहरामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button