breaking-newsमुंबई

राज्यात काल १८ हजार १०५ नवे कोरोना रुग्ण

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. राज्यात काल १८ हजार १०५ नवे रुग्ण आढळले असून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८ लाख ४३ हजार ८४४वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे कोरोना रुग्णांच्या संख्येत जगात ५व्या स्थानी असलेल्या पेरू या देशापेक्षाही महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काल दिवसभरात राज्यात ३९१ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला, तर १३ हजार ९८८ जणांनी कोरोनावर मात केली. यासह राज्यातील कोरोनाबळींचा आकडा २५ हजार ५८६ इतका झाला असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६ लाख १२ हजार ४८४वर पोहोचली आहे. तसेच राज्यात सध्या २ लाख ५ हजार ४२८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत गुरुवारी १ हजार ५२६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर ३७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १ लाख ५० हजार ९५वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ७ हजार ७६१ इतका झाला आहे. तसेच काल दिवसभरात ८५९ जण कोरोनामुक्त झाल्याने मुंबईत आतापर्यंत १ लाख २० हजार ५६१ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुणे जिल्ह्याचा अग्रस्थानी क्रमांक आहे. पुणे शहरातील एकूण रुग्ण संख्येने आता एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. गुरुवारी दिवसभरात पुण्यात १ हजार ७६४ नवे कोरोना रुग्ण आढळले. तर २६ रुग्णांचा मृत्यू झाला. याचबरोबर शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ४५९वर पोहोचली. तर कोरोनाबळींचा आकडा २ हजार ४०१ इतका झाला आहे. तसेच कोरोनावर उपचार घेणार्‍या १ हजार १८८ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने त्या सर्वांना काल डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे शहरात एकूण ८२ हजार ८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर सध्या ॲक्टिव्ह रुग्ण संख्या १५ हजार ९७३ एवढी आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात काल दिवसभरात १ हजार २१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर २० जणांचा मृत्यू झाला. तसेच ५ हजार ५८१ जण कोरोनातून ठणठणीत बरे झाले. यासह पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५२ हजार २८४वर पोहोचली असून त्यापैकी ४१ हजार ७०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ५ हजार ७२५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button