breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या !

– कोणाला- कोणती जबाबदारी मिळाली वाचा !

पिंपरी । प्रतिनिधी

राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. राज्यशासनाकडून नुकतीच त्याला मान्यता मिळाली असून बदलीचे आदेशही संबंधितांना मिळाले आहे.

बदली झालेल्यांमध्ये एस चोकलिंगम यांची जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे वरून महासंचालक, यशदा पुणे या पदावर नियुक्ती झाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क, पुणे या पदावर नियुक्ती झाली. राजेश पी पाटील (ओडिसा केडर) आंतरराज्य प्रतिनियुक्तीने राज्यवरून त्यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर नियुक्ती झाली.

शितल उगले-तेली यांची नियुक्ती संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर या पदावर, प्रेरणा देशभ्रतार आयुक्त, अपंग कल्याण, पुणे यांची नियुक्ती जिल्हाधिकारी वर्धा या पदावर, अनिता पाटील भारतीय वायुसेना उपवनसंरक्षक भूमिअभिलेख, पनवेल यांची नियुक्ती सदस्य सचिव, राज्य महिला आयोग, मुंबई या रिक्त पदावर, एन. के. सुधांशु यांची केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्य शासनाकडे रुजू झाल्यानंतर, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
…….,

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button