breaking-newsमनोरंजन

पुरुषाेत्तम करंडकाचा अाज ठरणार यंदाचा मानकरी

पुणे  –  पुण्यातील नाट्यवर्तुळात मानाची समजल्या जाणाऱ्या पुरुषाेत्तम करंडक अांतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीला अाज सुरुवात झाली असून रात्री उशीरा अंतिम फेराचा निकाल जाहीर करण्यात येणार अाहे. यंदा पुन्हा एकदा नावाजलेले संघ अंतिम फेरीत दाखल झाल्याने यंदा करंडकासाठी चुरस पाहायला मिळणार अाहे.

पुरुषाेत्तम करंडकाच्या प्राथमिक फेरीचा निकाल 28 अाॅगस्ट राेजी जाहीर करण्यात अाला हाेता. अंतिम फेरीत 9 संघांची निवड करण्यात अाली हाेती. त्यात टिळक अायुर्वेद महाविद्यालय, मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, माॅर्डन अभियांत्रिकी महाविद्यालय, पेमराज सारडा महाविद्यालय, गरवारे वाणिज्य महाविद्यालय, माॅर्डन कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, स. प. महाविद्यालय, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय या संघांचा समावेश अाहे. प्राथमिक फेरीला संजय पेंडसे, विनय कुलकर्णी, मानसी मागीकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले हाेते. अाज सकाळी 9 वाजता अंतिम फेरीतील सादरीकरणांना सुरुवात झाली अाहे. पुरुषाेत्तम करंडकावर नाव काेरण्यासाठी प्रत्येक संघात चुरस पाहायला मिळत अाहे. या करंडकाचे यंदाचे 54 वे वर्ष अाहे. यंदा वाणिज्य महाविद्यालयांचा अंतिम फेरीत दबदबा पाहायला मिळताेय. त्यातही मातब्बर संघ अंतिम फेरीत असल्याने ही फेरी चांगलीच रंगणार अाहे.

गेल्या काही वर्षांमध्ये पुरुषाेत्तम करंडकातील विषय बदलेले पाहायला मिळत अाहेत. या स्पर्धेत संहिता अाणि अभिनय याला जास्त महत्त्व असल्याने विद्यार्थी या दाेन गाेष्टींवर अधिक भर देत असतात. यंदा या दाेन गाेष्टींबराेबरच संगीत,  प्रकाशयाेजना तसेच तांत्रिक बाबींवरही विद्यार्थ्यांनी अधिक लक्ष दिले अाहे. त्यामुळे यंदा पुरुषाेत्तम करंडक कुठला संघ मिळवताे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार अाहे. सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर येथे ही स्पर्धा सुरु असून रात्री उशीरा अंतिम फेरीचा निकाल जाहीर केला जाणार अाहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button