breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18,37,358 वर

  • मुंबईत 878, पुण्यात 793 नवे रुग्ण

मुंबई – गुरुवारी दिवसभरात आढळलेल्या 5,182 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 18,37,358 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 8,066 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 115 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 17,03,274 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 47,472 वर पोहोचला आहे. तर सध्या 85,535 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत गुरुवारी कोरोनाचे 878 नवे रुग्ण आढळले, तर 18 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,83,689 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 10,857 इतका झाला आहे. तसेच काल दिवसभरात 764 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने मुंबईत आतापर्यंत 2,58,112 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 13,154 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 793 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 18 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3,45,533 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 8,449 इतका झाला आहे. तसेच काल 1,052 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 3,26,010 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या 793 रुग्णांमध्ये 355 रुग्ण पुणे शहरातील असून 165 रुग्ण हे पिंपरी-चिंचवड आणि 191 ग्रामीण भागातील व 82 कंटेनमेंट झोनमधील रुग्ण आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button