breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18,32,176 वर

  • मुंबईत 877, पुण्यात 913 नवे रुग्ण

मुंबई – बुधवारी दिवसभरात आढळलेल्या 5,600 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 18,32,176 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 5,027 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 111 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 16,95,208 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 47,357 वर पोहोचला आहे. तर सध्या 88,537 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत बुधवारी कोरोनाचे 877 नवे रुग्ण आढळले, तर 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,82,811 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 10,839 इतका झाला आहे. तसेच काल दिवसभरात 205 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने मुंबईत आतापर्यंत 2,57,348 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 13,060 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 913 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. काल आढळलेल्या 913 रुग्णांमध्ये 371 रुग्ण पुणे शहरातील असून 223 रुग्ण हे पिंपरी-चिंचवडमधील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button