breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये सुस्ती असतानाही भारतीय तेल कंपन्यांनी मात्र दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर कालपासून पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढविण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी पेट्रोलचे भाव 15 पैसे प्रतिलिटर आणि डिझेलचे भाव 23 पैसे प्रतिलिटरनं वाढवले होते. आज त्यामध्ये आणखी वाढ झाली आहे. आज पेट्रोलची किंमत 17 पैशांनी, तर डिझेची किंमत 19 पैशांनी वाढली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत 1 लिटर पेट्रोलचा भाव 82.66 रुपये झाला असून एक लिटर डिझेलचा भाव 72.84 रुपये झाला आहे.

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किंमती वाढून क्रमश: 82.66 रुपये, 84.18 रुपये, 89.33 रुपये आणि 85.59 रुपये प्रतिलिटर इतक्या झाल्या आहेत. तर चार शहरांतील डिझेलच्या किंमती वाढून क्रमश: 72.84 रुपये, 76.61 रुपये, 79.42 रुपये आणि 78.24 रुपये प्रतिलिटर झाल्या आहेत.

दरम्यान, 20 नोव्हेंबरनंतर वाहनांच्या इंधनाच्या किंमतीत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दोन आठवड्यांच्या दिलाशानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर पुन्हा एकदा वाढवले आहेत. 14 दिवसांत पेट्रोल 1.63 रुपये प्रतिलिटर महागले आहे. त्याचदरम्यान डिझेलचे दर 2.30 रुपये प्रतिलिटरने वाढले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button