breaking-newsराष्ट्रिय

शरद यादव यांनी वसुंधरा राजेंची मागितली माफी

जनता दल संयुक्तचे माजी नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची माफी मागितली आहे. वसुंधराराजे यांच्यासोबत जुने कौटुंबिक संबंध आहेत. माझ्या शब्दांमुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो, याबाबत मी त्यांना एक पत्र देखील लिहिणार आहे. असे लोकशाही जनता दलाचे प्रमुख शरद यादव यांनी म्हटले आहे.

काय म्हटले होते शरद यादव –
शरद यादव यांनी राजस्थानच्या अलवर येथील सभेत बोलताना, वसुंधराराजेंना आता आराम करू द्या. त्या खूप थकल्या आहेत. वसुंधराराजे खूप जाड झाल्या आहेत. पूर्वी त्या खूप बारीक होत्या, असे वक्तव्य केले होते.

वसुंधरा राजे यांचे निवडणूक आयोगाला आवाहन –
आपल्यावर जनता दल संयुक्तचे माजी नेते शरद यादव यांनी शरीरवाचक टीका करताना ‘ही जाडी बाई आता दमली आहे तेव्हा मतदारांनी तिला विश्रांतीसाठी घरी बसवावे’ असे वक्तव्य करून खालची पातळी गाठली आहे, यादव यांची टिप्पणी एका महिलेसाठी लज्जास्पद असून त्यांचा हा दृष्टिकोन सर्व महिलांसाठी अपमानकारक आहे, . तसेच, ही बाब अत्यंत क्लेशदायक असून याची निवडणूक आयोगाने दखल घ्यावी, अशी तक्रार राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button