breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 17,57,520 वर

  • मुंबईत 871, पुण्यात 722 नवे रुग्ण

मुंबई – बुधवारी दिवसभरात आढळलेल्या 5,011 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 17,57,520 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 6,608 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 100 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 16,30,111 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 46,202 वर पोहोचला आहे. तसेच सध्या 80,221 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत बुधवारी कोरोनाचे 871 नवे रुग्ण आढळले, तर 16 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,71,525 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 10,612 इतका झाला आहे. तसेच काल दिवसभरात 1,372 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली, यासह मुंबईत आतापर्यंत 2,48,711 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 8,658 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 722 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 23 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3,32,867 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 8,219 इतका झाला आहे. तसेच काल दिवसभरात 524 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 3,15,391 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या 722 रुग्णांपैकी 384 रुग्ण हे पुणे शहरातील आणि 158 रुग्ण हे पिंपरी-चिंचवड येथील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button