breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16,45,020 वर

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्राची रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. रविवारी आढळलेल्या 6 हजार 059 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 16 लाख 45 हजार 020 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 112 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावल्याने कोरोनाबळींचा आकडा 43 हजार 264 इतका झाला आहे. तसेच एका दिवसात 5 हजार 648 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने राज्यात आतापर्यंत एकूण 14 लाख 60 हजार 755 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 1 लाख 40 हजार 486 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसला आहे. मुंबईत रविवारी कोरोनाचे 1 हजार 222 नवे रुग्ण आढळले, तर 46 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2 लाख 51 हजार 281 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 10 हजार 105 इतका झाला आहे. तसेच मुंबईत आतापर्यंत 2 लाख 20 हजार 165 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर सध्या 19 हजार 721 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button