breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२,२४,३८० वर

  • मुंबईत १,८३७, पुण्यात २,३३८ नवे रुग्ण

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाचा विळखा दिवसागणिक घट्ट होतोय. सोमवारी दिवसभरात राज्यात १५ हजार ७३८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर ३४४ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १२ लाख २४ हजार ३८० वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ३३ हजार १५ इतका झाला आहे. दरम्यान, राज्यात सध्या २ लाख ७४ हजार ६२३ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल १ हजार ८३७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर ३६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १ लाख ८६ हजार १५० वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ८ हजार ५०२ इतका झाला आहे. तसेच मुंबईत सध्या २६ हजार ७३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत १ लाख ५० हजार ५३५ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

पुणे जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात २ हजार ३३८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पुण्याची एकूण रुग्ण संख्या आता २ लाख ५४ हजार ५०६ वर पोहोचली आहे. त्यातच काल ३ हजार ७ व्यक्तींनी कोरोनावर मात केली, तर ८६ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. यासह पुण्यात आतापर्यंत २ लाख ६ हजार ५१६ जण कोरोनामुक्त झाले असून ५ हजार ७८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button