Uncategorized

IPL2020: विराटच्या आरसीबीकडून हैदराबादचा १० धावांनी पराभव

दुबई – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(आरसीबी)ने सीजनच्या आपल्या पहिल्या सामन्यात सनराइजर्स हैदराबादचा 10 धावांनी पराभव केला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीने पहिलाच सातना दणक्यात जिंकला. फिरकीपटू युजवेंद्र चहलने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आरसीबीला हा सामना जिंकता आला. आरसीबीने हैदराबादपुढे विजायासाठी १६४ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र हे आव्हान हैदराबादच्या संघाला पेलवले नाही आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने मोक्याच्या क्षणी घेतलेल्या दोन विकेट्स आणि अखेरच्या षटकात सैनीचा भेदक मारा याच्या जोरावर बंगळुरूने विजयाने स्पर्धेला सुरुवात केली. बंगळुरूने निर्धारित २० षटकात ५ बाद १६३ धावा करत प्रतिस्पर्धी सनरायझर्स हैदराबाद संघासमोर १६४ धावांचे आव्हान ठेवले होते. सनरायझर्स हैदराबादचा संघ १९.४ षटकात १५३ धावांत आटोपला. सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. उमेश यादव घेऊन आलेल्या दुसऱ्या षटकात डेविड वॉर्नर फॉलो थ्रोवर बाद झाला. जॉनी बेयरस्ट्रॉने फाटकावलेला चेंडू यादवच्या हाताला लागून स्टम्पवर आदळला आणि हैदराबादला मोठा धक्का बसला. त्यानंतर बेयरस्ट्रॉने मनीष पांडेसोबत ७० धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मात्र चाहलने पांडेला माघारी धाडत सेट झालेली जोडी फोडली. त्यानंतर चहलने एकापाठोपाठ बेयरस्ट्रो आणि विजय शंकरला बाद करत सामना बंगळुरूच्या बाजूने वळवला. चहलने या सामन्यात ४ षटकात १८ धावा खर्च करत ३ महत्त्वपूर्ण बळी टिपले. हाच सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. तर नवदीप सैनीने २, शिवम दुबेने २ आणि डेल स्टेनने १ गडी बाद केला.

दरम्यान, बंगळुरूच्या या विजयासह विराट कोहली लीगमध्ये एका संघाला ५० पेक्षा जास्त सामने जिंकून देणारा चौथा कर्णधार झाला आहे. विराटपूर्वी महेंद्र सिंह धोनीने चेन्नई सुपरकिंग्स, गौतम गंभीरने कोलकाता नाइट राइडर्स आणि रोहित शर्माने मुंबई इंडियंसला 50 पेक्षा जास्त सामने जिंकून दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button