breaking-newsमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ८२ हजार ३८३ वर

  • मुंबईत ७४३, पुण्यात २,३५१ नवे रुग्ण

मुंबई – महाराष्ट्रात सोमवारी दिवसभरात १० हजार ४४१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर २५८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ६ लाख ८२ हजार ३८३ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा २२ हजार २५३ इतका झाला आहे. तसेच राज्यात सध्या १ लाख ७१ हजार ५४२ रुग्ण उपचार घेत आहेत, तर ४ लाख ८८ हजार २७१ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सोमवारी दिवसभरात कोरोनाचे ७४३ नवे रुग्ण आढळले. तर २० रुग्णांनी आपले प्राण गमावले. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १ लाख ३७ हजार ९१ वर पोहोचली आहे. तर सोमवारी दिवसभरात १ हजार २५ जणांनी कोरोनावर मात केली. यासह मुंबईत आतापर्यंत १ लाख ११ हजार ८४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात २ हजार ३५१ नवे कोरोना रुग्ण आढळले. यात पुणे शहरातील १ हजार १०१ जणांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात दिवसभरात २ हजार ३५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ९१ रुग्णांचा मृत्यू झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button