breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त, काही दिवस होम क्वारंटाइन राहणार

मुंबई – राज्याचे माजी मुख्यमंत्रीी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यांना आज सायंकाळी सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयाच्या बाहेर येताच देवेंद्र फडणवीस यांनी हात जोडून सगळ्यांना अभिवादनही केलं. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आणि माजी मंत्री गिरीश महाजनही होते.

२४ ऑक्टोबर रोजी देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी गिरीश महाजनांना दिलेल्या वचनाप्रमाणे सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले.

सेंट जॉर्ज रुग्णालयाचे सुप्रीटेंडंट डॉ. आकाश खोब्रागडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुढचे १० दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला आहे. देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर होम क्वारंटाइन असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना शुगरचा त्रास असल्याने त्यांची थोडी अधिक काळजी घ्यावी लागत होती. देवेंद्र फडवीस यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही ९३ पर्यंत खाली आली होती. त्यामुळे मागील आठवड्यात त्यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९७ पर्यंत वाढली. गेल्या रविवारी आणि सोमवारी देवेंद्र फडणवीस यांना प्लाझ्मा थेरपीचे डोसही देण्यात आले होते असंही डॉ. खोब्रागडे यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button