breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

परीक्षेला बसलेले 3 विद्यार्थी पॉझिटिव्ह ; ६०० पालकांविरुद्ध गुन्हा दाखल

तिरुवनंतपुरम | देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे अजूनही काही विद्यापीठं मुलांच्या परीक्षा घेत आहेत. मेडिकल, अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी घातक ठरत आहेत. अशीच एक प्रवेश परीक्षा केरळमधील इंजिनिअरिंग आर्किटेक्चर मेडिकलने (केइएएम) आयोजित केली होती. मात्र या परीक्षेदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम मोडण्यात आले. परिणामी परीक्षेला बसलेले विद्यार्थी आणि पालक असे एकूण ६ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी तब्बल ६०० पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याआधी या परीक्षेला बसलेले दोन विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले आले होते, त्यानंतर आणखी एक विद्यार्थी आणि उपस्थित पालकांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. दरम्यान, या प्रकारानंतर केरळ सरकारने केइएएमवर कारवाई करण्याचे ठरवल्यानंतर परीक्षा केंद्राबाहेर पालकांनी केलेल्या गर्दीचा फोटो व्हायरल झाला. या फोटोवरून या परीक्षेस उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या ६०० पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button