breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

स्पर्धा मनोबल वाढविणारी असते: भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे

पिंपरी | प्रतिनिधी

कोणतीही स्पर्धा ही मनोबल वाढविणारी असते असे मत भोसरी विधानसभा मतदार संघाचे प्रथम आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केले. गणेशोत्सव आला की सर्व भक्तांची सजावटची लगबग चालु होते, तन मन लावून घरातील सर्वजण गौरी गणपतीचे डेकोरेशन करत असतात. आणि या निमित्ताने सर्वांमध्ये सजावटीचा मोठा उत्साह असतो व हा उत्साह द्विगुणित होऊन महिलांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यामध्ये असलेली कल्पकता देखील समाजाला कळावी यासाठी अतिश आनंदा बारणे यांनी गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली होती.

नुकताच त्याचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. या स्पर्धेला महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या प्रतिसादाला दाद म्हणून प्रत्येक स्पर्धकाला भेट वस्तु देण्यात आली. तसेच प्रथम 20 क्रमांकाना आकर्षक भेटवस्तु देण्यात आली. त्यामध्ये श्रद्धा बरावडे, किर्ती पुरी, सविता पगार, सुमित्रा घोलप, नम्रता वीर, निखिल गुरव, स्नेहल जोशी, मंजुषा खोलम, उज्वला कुलकर्णी, प्रतिभा मोगरे, रेखा बिराजदार, छाया ढोले, संगीता पगिरे, सारिका हुळावळे, अमोल घाटगे, प्रणिता कदम, स्नेहा लोंढे, कल्पना वाढे, दिपाली इथापे, दिपाली आवारी या स्पर्धकांनी बक्षीस पटकावले.

यावेळी उपस्थित पुणे जिल्हा निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कविता ताई आल्हाट, युवा नेते विजय सस्ते, नवनाथ बारणे, गणेश निकम, पुरुषोत्तम आवटी उपस्थित होते.

Competition is morale boosting: Bhosari's first MLA Vilas Lande
स्पर्धा मनोबल वाढविणारी असते: भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button