पुण्यात शिवसेनेने एकही जागा मागितल्या नाही, चंद्रकांत पाटील यांची माहिती
पुण्यात शिवसेनेची एकही शाखा नाही, सोशल मीडियावर खिल्ली
कोल्हापूर – राज्यातील अनेक जिल्ह्यात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. नागपूर आणि पुणे जिल्ह्यात सर्व जागा भाजपला मिळाल्या आहेत, असं सांगतानाच शिवसेनेनेही या जागांसाठी आग्रह धरला नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चंद्रकांत पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.
पाटील म्हणाले की, सातारा जिल्ह्यात भाजपला आठ पैकी पाच तर सांगली जिल्ह्यात आठ पैकी चार जागा मिळाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार आहेत. गेल्यावेळी कागल आणि चंदगड मतदार संघात शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यामुळे या जागा त्यांना मिळाल्या आहेत. कागलमध्ये समरजित घाटगे यांनी चांगली तयारी केली होती हे मला मान्य आहे. त्यांच्यासाठी भाजपने खूप प्रयत्न केले. पण आमचे सर्व कार्यकर्ते चांगले असल्याने जागा वाटपाचा निर्णय ते मान्य करतील. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार धनंजय महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक उपस्थित होत्या.