breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

राजस्थान मधील काँग्रेसच्या १९ बंडखोर आमदारांचा आज निर्णय, विश्वासदर्शक ठरावाची घोषणा शक्य

मुंबई : राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्याबाबत जोरदार हालचाली होताना दिसत आहेत. कॉंग्रेसच्या १९ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या नोटीसविरोधात दाखल याचिकेवर राजस्थान उच्च न्यायालय आपला निर्णय देणार आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीत सचिन पायलट गटातील पृथ्वीराज मीणा यांनी याचिका दाखल केली होती आणि केंद्र सरकारला या प्रकरणात पक्ष म्हणून घेण्याची मागणी केली होती. आज यावर निकला लागणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत आज विश्वासदर्शक ठरावाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

 मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काल राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतलेली आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांचा दावा आहे की सरकारला कोणतीही अडचण नाही आणि ते लवकरच आपले बहुमत सिद्ध करणार आहे. त्याचबरोबर पायलट गटाचा असा विश्वास आहे की सरकार अल्पमतात आहे आणि लवकरच पडेल. मुख्यमंत्री गेहलोत यांनी लवकरच विधानसभा अधिवेशन बोलावणार असल्याची माहिती दिली आहे. गेहलोत आणि पायलट गटामध्ये कायदेशीर लढाई सुरु असतानाच अशोक गेहलोत यांनी हे वक्तव्य केलेले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button