breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘राजमुद्रा स्टिकर’चा वापर करुन ‘तोतया आमदारांचा’ पिंपरी चिंचवडमध्ये सुळसुळाट 

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे पोलिस आयुक्तांकडे कारवाईची मागणी 

पिंपरी ( महा ई न्यूज) – पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघात असंख्य फोर व्हीलर वाहनावर “महाराष्ट्र विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य” अशा आशय असलेल्या चिन्हांचे राजमुद्रा स्टिकर लावून ‘ भूरट्या कार्यकर्त्यांना आमदार झाल्या सारखं वाटू लागलंय’ तसा तोरा मिरवला जात आहे. तसेच शहरात काही कार्यकत्यांच्या गाडीवरती “महाराष्ट्र विधानसभा सदस्य” अशा आशयाचे चिन्हे सर्रास वापरली जावू लागली आहे. याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले असून आमदारांनीही कार्यकर्त्यांना अभय दिल्याचे दिसून येत आहे.

याबाबत महापालिका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पोलिस आयुक्तांना पत्र देवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात अनेक महागडी वाहने पुढारी, त्याचे नातेवाईक, कट्टर कार्यकर्ते  विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य अशा आशयांचे राजमुद्रा असलेले लोगो वापरुन कामे करु लागले आहेत. काही स्वंयघोषित कार्यकर्त्यांनी आपल्या गाडीवर “महाराष्ट्र विधानसभा आमदार” लोगो लावून पिंपरी-चिंचवडमध्ये फिरताना दिसत आहेत.

शहरात आमदारांच्या गाड्यांना लावले जाणारे विधानसभा सदस्य हे स्टिकर सध्या कोणीही आपल्या गाड्यांना लावून फिरत आहे. शहरात विधानसभा मतदार संघ असे स्टिकर लावून फिरणार्‍या तोतया आमदारांची संख्या वाढू लागली आहे. आपली आमदाराशी जवळीक आहे किंवा आमदार आपल्या खिशातच आहे, हे दाखविण्यासाठी हे स्टिकर मिळविण्यासाठी आमदारांचे नातेवाईक, मित्र आणि कार्यकर्त्यांचा आटापिटा चालला आहे.

शहराच्या कार्यक्षेत्रात तीन विधानसभा सदस्य आहेत. परंतु पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात विशेष:त  भोसरी,चिखली,मोशी परीसरामध्ये जागोजागी विधानसभा सदस्य आणि राजमुद्रा अशा आशयाचे स्ट्रिकर वाहनांच्या दर्शनी भागावर व मागील काचेवर लावून वाहने फिरत आहेत. ही वाहने विधानसभा सदस्यांची नसून त्यांच्या कार्यकर्त्यांची आहेत.  महापालिका मुख्यालयात सुध्दा हि वाहने आढळून येत आहेत. त्यामुळे नागरीकांमध्ये सभ्रंम निर्माण होत आहे.

दरम्यान, सुरक्षितेच्या दृष्टीने विधानसभा सदस्यांच्या वाहनासाठी शासनाकडून स्टिकर पुरविले जाते. ते विधानसभा सदस्यांनी आपल्या स्वत:च्या मालकीच्या व नेहमीच्या वापरातील वाहनावर लावणे अपेक्षित आहे. त्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून या सन्मानियांना सुलभ प्रवेश मिळणे सुकर व्हावे, हा त्यामागचा हेतू आहे. परंतू, त्या स्टिकरचा वापर चुकीच्या मार्गाने होवू लागला आहे. या स्टिकरचा गैरवापर होवू लागल्याने अशा वाहनांवर कडक कारवाईची मागणी साने यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button