TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

राजमाता जिजाऊ उद्यानातील नवीन पाण्याची टाकी तात्काळ कार्यान्वित करावी; शत्रुघ्न काटे यांचे आयुक्तांना निवेदन

पिंपरीः महापालिकेमार्फत दिवसांआड होणारा पाणीपुरवठा पण अनियमित आणि कमी दाबाने होणारा आहे, त्यामुळे पाणी पुरवठ्याची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यानातील नवीन पाण्याची टाकी तात्काळ कार्यान्वित करावी अशी मागणी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना काटे यांनी आज (दि.१४) यासंदर्भात निवेदन दिले आहे.

शत्रुघ्न काटे यांनी निवेदनात प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर रहाटणी मधील पाण्याच्या समस्येबाबत लक्ष वेधले आहे. पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यानात २० लाख लिटर क्षमतेच्या नवीन पाण्याची टाकी बनविण्यात आली आहे. सर्व काम पुर्ण झाल्यानंतर ही अजून ही पाण्याची टाकी अद्याप कार्यान्वित करण्यात आलेली नाही. त्यामुळे या परिसरात पाणी पुरवठ्याचा प्रश्न उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भेडसावत आहे.

सदर नवीन टाकी कार्यान्वित होण्यास एवढा विलंब का लागत आहे? यामध्ये काय अडचणी आहेत ? अश्या नागरिकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे शत्रुघ्न काटे यांनी या निवेदनाद्वारे आयुक्तांकडे मागणी केली आहे. तसेच राजमाता जिजाऊ उद्यानातील सदर नवीन टाकी लवकरात लवकर कार्यान्वित करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी विनंती केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button