breaking-news

राजगुरुनगर बॅंकेच्या 19 संचालकांसह 21 जणांना अटक

  • वाहन कर्जात 58 लाख रुपयांचा घोटाळा : कर्ज विभाग प्रमुखाचाही समावेश

पुणे – वाहन कर्जात 58 लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी राजगुरुनगर सहकारी बॅंक लि. च्या 19 संचालकांसह 21 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये कर्ज विभाग प्रमुखाचाही समावेश आहे.

अप्पर विशेष लेखापरिक्षक विजय पालखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बॅंकेच्या दोन कर्मचाऱ्यांसह 19 संचालकांना अटक करण्यात आली आहे. बॅंकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक अशोक मोतीलाल ओसवाल, मुख्य शाखेतील कर्ज विभागाचे प्रमुख अशोक कोंडजी गावडे, संचालक दीपक पोपट वारुळे, धनंजय मधुकर कहाणे, प्रताप महादेव आहेर, मुकुंद मारुती आवटे, किरण चंद्रकांत आहेर, किरण वसंत मांजरे अशोक महादू भुजबळ, राजेंद्र दशरथ वाळुंज, गणेश एकनाथ थिगळे, विनायक शुरसेन घुमटकर, राहूल पोपटराव तांबे, हेमलता सेनापती टाकळकर, दिनेश रमेश ओसवाल, सतिश बबन नाईकरे पाटील, परेश चंद्रकांत खांगटे, राजेंद्र मारुती सांडभोर, दत्तात्रय काशिनाथ गोरे, विजया शिंदे आणि नंदकिशोर रखमाजी सोनवणे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता जामिनावर सुटका करण्यात आली.
बनावट दस्तऐवज व खोट्या तारणाच्या आधारे बनावट व्यक्तींना कर्ज देताना त्यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्यांचे पालन न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरुनगर बॅंकेच्या बुधवार पेठ येथील शाखेतून राहूल श्रीकांत गोसावी (रा. बुधवार पेठ), विनय रमेश गोसावी (रा. शुक्रवार पेठ) आणि प्रज्ञा विवेक ठोंबरे (रा. धायरी) यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींच्या नावे वाहन खरेदीच्या नावाखाली प्रत्येकी 18 लाख असे एकूण 84 लाख रुपयांचे कर्ज काढले. मात्र वाहन खरेदी न करता त्यांनी या पैशांचा अपहार केला. 2008 ते 2011 दरम्यान हा सर्व प्रकार घडला. कर्ज देताना बॅंकेचे शाखा व्यवस्थापक, कर्ज विभागाचे प्रमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधीत कर्जाच्या प्रकरणाची पडताळणी करणे आवश्‍यक होते. तसेच कर्जदाराची कर्जपरतफेड करण्याची क्षमता देखील तपासली नाही. बनावट व्यक्तींना सभासद करून कर्ज दिले. या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी लेखापरिक्षक पालखे यांच्याकडे देण्यात आली होती.

राहूल गोसावी, विनय गोसावी आणि प्रज्ञा ठोंबरे यांना 58 लाखाचे बेकायदेशीर पद्धतीने कर्ज देण्यात आल्याचे निर्दशनास आले. दरम्यान याप्रकरणी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुनाथ भिकुशेठ लोंबर यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता. त्यांच्यावतीने ऍड. हेमंत झंजाड यांनी कामकाज पाहिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button