breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रहाटणी फाटा येथे चारजणांच्या टोळक्याकडून एकावर कोयत्याने वार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – कारण नसताना चराजणांच्या टोळक्याने एकाला बेदम मारहाण करून  डोक्यात कोयत्याने वार केल्याची घटना रहाटणी फाटा येथे शुक्रवारी (दि. 28) रात्री पावनेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी चौघांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शुभम काटे, पवन मंडलीक, दिलीप कसर, अमोल कसर (सर्व रा. रहाटणी, पूर्ण पत्ता माहीत नाही) यांच्याविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी विरशेट्टी विश्वनाथ ठाकूर (वय 27, रा. आमरदीप कॉलनी, रहाटणी फाटा, पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरशेट्टी हा मित्रासोबत बोलत उभा होता. आरोपींनी काहीही कारण नसताना अचानक येऊन शिवीगाळ केली. हातानी मारहाण केली. त्यावर घाबरलेल्या अवस्थेत पळून जात असताना शुभम काटे याने पाठलाग करून विरशेट्टीच्या डोक्यात कोयत्याने वार केला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. पुढील तपास वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button