breaking-newsपिंपरी / चिंचवड

रहाटणी-पिंपळे साैदागरचा पाणी प्रश्न सोडवा, अन्यथा रस्ता रोको आंदोलन

महापालिका आयुक्तांना नगरसेवक नाना काटे यांचे निवेदन 

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  रहाटणी पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 28 मध्ये कमी पाणीपुरवठा होत आहे. संबंधित पाणीप्रश्न लवकरात लवकर सोडवावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदनांतून दिला आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, रहाटणी पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 28 मध्ये अनेक दिवसांपासून कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा केंद्रावरुन प्रभागात पाणी पुरविले जाते तिथेसुध्दा पाणी पोहचत नाही. पावसाळ्याचे दिवस असून महापालिकेला पाणीपुरवठा करणारे धरण पूर्ण भरले असतानासुध्दा नागरिकांना रोज या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पाणी समस्येची वारंवार तक्रार करुन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दुर्लक्ष होत आहे.

रहाटणी पिंपळे सौदागर या प्रभागातील नागरिक या पाणी समस्येला त्रासले आहेत. रहाटणी पिंपळे सौदागर प्रभागातील पाणीपुरवठा कायमस्वरुपी सुरळीत करुन नागरिकांना पाणी समस्येतून मुक्त करावे. लवकरात लवकर ही पाणी समस्या सोडविली नाही, तर नागरिकांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button