breaking-newsपिंपरी / चिंचवड

रहाटणीतील छत्रपती चौक आजपासून सील, पुढील आदेशापर्यंत स्थिती कायम राहणार

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या Covid 19 या संसर्गजन्य आजारामुळे पिंपरी चिंचवड शहरात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचा प्रादुर्भावामुळे रोखण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रात आपत्कालीन उपाययोजना लागू करण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाण बाधित रुग्णांची संख्या विचारात घेता येत्या काळात पिंपरी चिंचवड शहरात रुणांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरातील काही भागांमध्ये पुढील काही दिवस नागरिकांच्या हालचालींवर, बाहेर फिरणाऱ्यांवर मर्यादा आणण्यात येत आहेत.

कोविड – १९ चा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी व संभाव्य मामुदायीक प्रमार (Community Transfer) टाळण्यासाठी शहरातील नागरिकांच्या हालचालीवर, बाहेर फिरण्यावर मर्यादा आणण्याकरीता खालील नमुद परिसर हा Cluster Containment Zone म्हणून सील करणेत येत आहे.

छत्रपती चौक, रहाटणी (श्रीनंदा क्लासिक – सिध्दीविनायक मंदिर – रेणुका माता मंदिर – बसेरा रेसिडन्सी – ओंम मेडिकल स्टोअर – जीवन क्लिनीक – छत्रपती चौक – श्रीनंदा क्लासिक) 5 उपरोक्त सीमाभागामधील संपुर्ण भाग येथील सर्व संबंधित पोलिस ठाण्यांच्या अंकित असलेला सोबतच्या नकाशात दर्शविलेला परिसर ( परिशिष्ठ १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे ) बुधवार, दि . १३ मे २०२० रोजी रात्री ११.०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे. त्यानुसार सदर परिसरातील संबंधित पोलिस स्टेशन प्रमुख या भागाच्या हद्दी सील करतील. त्यानुसार सदर परिसरांच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी करण्यात येत आहे.

सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात येत आहे . तथापि, १ ) सदर आदेशान्वये कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी व वाहने तसेच शासकीय व सेवा देण्यात येणाऱ्या वाहनांना सदरच्या आदेशानुसार वगळण्यात येत आहेत.

उपरोक्त नमुद प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या बँकींग सुविधांसाठी सर्व बँकांनी शाखा बंद ठेवाव्यात व केवळ आपली एटीएम केंद्रे कार्यान्वीत ठेवावीत. पुढील काळात शहरातील रुग्णांची संख्या विचारात घेता टप्प्याटप्प्याने शहरातील इतर भागांत देखील या प्रकारचे निर्बंध लागू करण्याबाबत आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी किमान सात दिवसांसाठी लागणारे जीवनाश्यक साहित्य गर्दी न करता प्राप्त करून घेऊन पूर्वतयारी करावी, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button