breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या तिघांना न्यायालयाने केला दंड

पिंपरी (महा ई न्यूज ) : वाहतूक नियम पायदळी तुडवत विरुद्ध दिशेने वाहने चालविणारे वाहनचालक संकेत सतीश निमट व नितीन गायकवाड यांना प्रत्येकी दोन हजार 500 रूपये तर चंद्रकांत थोरात याला पिंपरी न्यायालयाने एक हजार 100 रुपये दंड ठोठावला.

चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरुद्ध दिशेने वाहन चालवून स्वतःसह दुसऱ्याचाही जीव धोक्‍यात घालतात. त्यामुळे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी अशा बेशिस्त चालकांवर भारतीय दंड संहिता कलम 279 अनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार चिंचवड पोलिसांनी गुरुवारी विरूद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या तिघांवर कलम 279 अनुसार गुन्हा दाखल करून शुक्रवारी (ता. 14) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने तिघांनाही दोशी ठरवत दंड ठोठावला. वाहन चालकांनी विरूद्ध दिशेने वाहने चालवू नये. असे आवाहन निरीक्षक (गुन्हे) विश्‍वजित खुळे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button