breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सांगलीत बेकायदेशीरपणे गर्भपात करणाऱ्या हॉस्पिटलवर छापा

सांगली ( महा ई न्यूज ) –  म्हैसाळ येथील गर्भपात प्रकरणाची चर्चा थांबण्यापुर्वीच आता चक्क शहरातील मध्यवस्तीत बेकायदेशीर गर्भपाताचा प्रकार उघडकीस आला आहे. गणेशनगरमध्ये रोटरी हॉलच्या मागे असलेल्या चौगुले हॉस्पिटलवर पोलिस आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाने छापा टाकून हा प्रकार उजेडात आणला आहे. या हॉस्पिटलमध्ये गेल्या वर्षभरात सात बेकायदेशीर गर्भपात केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी हॉस्पिटलमधील तीन डॉक्‍टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेशनगमधील चौगुले हॉस्पिटलमध्ये विनापरवाना गर्भपात करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यावरुन आयुक्त रविंद्र खेबुडकर यांनी आज तेथे कारवाई करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते. आरोग्य अधिकारी डॉ. संजय कवठेकर आणि त्यांच्या पथकाने पोलिसांच्या सहकार्याने या हॉस्पिटलवर छापा टाकला. डॉ. स्वप्नील जमदाडे हे या सेंटरचे चालक आहेत, तर डॉ. विजयकुमार चौगुले आणि डॉ. रुपाली चौगुले हे त्यांचे असिस्टंट होते.

प्राथमिक तपासात महापालिकेच्या परवानगीशिवाय या हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररित्या गर्भपात केले जात असल्याचे समोर आले आहे. पथकाने काही संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच गर्भपाताची औषधेही याठिकाणी आढळून आली आहेत. छाप्यामध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि दारूच्या बाटल्याही सापडल्या आहेत. कागदपत्रांच्या तपासणीवरुन या ठिकाणी सहा गर्भपात केल्याचे समोर आले आहे. आणखी किती बेकायदा गर्भपात करण्यात आले आहेत.

तपासणी सुरू झाल्यानंतर हॉस्पिटलकडून काही औषधपत्रे जाळण्यात आली आहेत. यानंतर पोलिसांनी याठिकाणचे औषधे व रोख रक्कम जप्त केली. गेल्या वर्षी म्हैसाळ येतील बेकायदेशीर गर्भपाताचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक हादरुन गेला होता. पुन्हा एक वर्षानंतर सांगलीमध्ये बेकायदेशीर गर्भपाताचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button