breaking-newsपुणे

रंकाळा तलावांवर पक्षी गणना; 13 प्रजातींचे पक्षी हे परदेशी

कोल्हापूर |महाईन्यूज|

जागतिक पानथळ दिनाचे औचित्य साधून बर्डस् ऑफ कोल्हापूर या फेसबुक ग्रुपच्या वतीने पक्षी गणना करण्यात आली. संघटनेच्या वतीने सहाव्या टप्प्यातील पक्षीगणना रविवारी (दि. 2) रंकाळा तलाव येथे सकाळी केली गेली. कोल्हापूर शहर आणि परिसरातील तलावांवरील पक्षीगणनेची मालिका या संघटनेच्या वतीने करण्यात आली.

रंकाळा तलाव येथे करण्यात आलेल्या या पक्षीगणनेत 83 प्रजातींचे 1045 पक्षी नोंदवले गेले. यातील 13 प्रजातींचे पक्षी हे परदेशातून आलेले स्थलांतरीत पक्षी आहेत. स्थलांतरित पक्ष्यांमध्ये लाल कंठाचा माशीमार, गळाबंद पाणलाव यांचा समावेश आहे.

‘शेकाट्या’, ‘वारकरी’ आणि ‘पिवळा धोबी’ हे पक्षीही मोठ्या संख्येने दिसून आले. याशिवाय आज नोंदवलेल्या पक्ष्यांमध्ये राखी बगळा, छोटा कंठेरी चिलखा, नदी सुरय, ठिपकेवाली तुतारी, पांढर्‍या भुवईचा बुलबुल, पांढर्‍या छातीचा खंड्या यांचाही वावर आढळून आला.

या पक्षीगणनेवेळी आशिष कांबळे यांनी मार्गदर्शन केले. तर वनस्पती तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी यावेळी पाणथळ संस्थांची माहिती दिली. या पक्षी गणनेचे आयोजन प्रणव देसाई आणि सत्पाल गंगलमाले यांनी केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button