breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

योगगुरू रामदेवबाबा यांचे वेब कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन; डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा पुढाकार

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

डॉ. डी. वाय . पाटील विद्यापीठ पुणे यांच्या मार्फत योगगुरु रामदेव बाबा यांच्याबरोबर दि. ६ मे २०२० ( बुधवार ) रोजी   विशेष योग्  वेब कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली .   सद्य परिस्थितीत सर्वत्र  कोविड  -१९ (कोरोना व्हायरस ) प्रसार होत आहे , त्यामुळे  मानसिक आरोग्य  डळमळीत होऊन त्याचा परिणाम शरीरावर होत आहे . या सर्वातून बाहेर पडण्यासाठी , मनोबल वाढविण्यासाठी, विशेष म्हणजे शारीरिक दृष्ट्या सुदृढ होण्याच्या उद्देशाने या वेब कॉन्फरन्स चे आयोजन करण्यात आले.

या कॉन्फरन्ससाठी डॉ. डी. वाय . पाटील विद्यापीठाचे  कुलपती डॉ. पी.डी . पाटील  , उपाध्यक्षा  सौ भाग्यश्रीताई पाटील  , कुलगुरू  डॉ. एन . जे. पवार  ,  सेक्रेटरी डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त डॉ. सौ. स्मिता जाधव, खजिनदार आणि विश्वस्त डॉ. यशराज पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरंस द्वारे योग गुरु रामदेव बाबा यांच्याशी संवाद साधला  .

या वेब कॉन्फरन्स मध्ये योग गुरु रामदेव बाबा यांनी  कोरोना चा मुकाबला करण्यासाठी  रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी , निरोगी रहाण्यासाठी  विविध प्राणायाम , योगासने तसेच काही आयुर्वेदिक औषधे  या बद्दल मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक दाखवले  .

विशेष वेब योग कॉन्फरन्स मध्ये प्राचार्य डॉ. गुणवंत येवला (आयु.कॉलेज) यांनी डॉ. डी. वाय पाटील आयुर्वेद हॉस्पिटल मध्ये कोविड  -१९ च्या आयसोलेशन ची व्यवस्था  नियोजित आहे.  आयसोलेट रुग्णांनी बेड वरच कुठल्या प्रकारची आसने व प्राणायाम करता येतील ? , प्राचार्य डॉ. शर्मा ( होमिओपॅथी कॉलेज) यांनी या परिस्थिती मध्ये  मानसिक आरोग्य कसे राखता येईल ?, डॉ. भवाळकर (डीन मेडिकल कॉलेज.) यांनी कोरोना   रुग्णांवर  उपचार करणाऱ्या स्टाफची सुरक्षा , डॉ.  गोपालकृष्णन (डीन डेंटल कॉलेज.) यांनी दन्त रोगावर उपचार करणाऱ्या  डॉक्टरांनी आणि स्टाफ यांनी प्रतिकार  शक्ती कशी वाढवावी ?

 उप प्रा. डॉ. प्रशांत खाडे (आयु कॉलेज)  यांनी  कोरोनाच्या लढवय्यांसाठी आपण काय संदेश  द्याल ? असे प्रश्न विचारले ,या संवादाच्या  वेळी योग् गुरु रामदेव बाबा यांनी  विविध प्राणायाम -अनुलोम -विलोम, भस्रिका कपालभाती ,योगासने आणि आहार कि ज्या मुळे श्वास घेण्याची व फुफ्फुसाची क्षमता वाढून शरीर बळकट होईल तसेच  आयुर्वेदिक काढे  गुळवेल इ .  वनस्पतींपासून बनविलेले काढे घेणे  या विषयी मार्गदर्शन केले.

डॉ. डी. वाय . पाटील विद्यापीठ ,पुणे आणि युनिटेक सोसायटी यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व  संस्थांचे  डायरेक्टर्स , डीन आणि प्रिंसिपल्स या कार्यक्रमात  व्हिडीओ  कॉन्फरन्सिंग द्वारे सहभागी झाले.

योग गुरु रामदेव बाबांचे  स्वागत  कुलपती मा. डॉ पी.डी . पाटील  यांनी केले. कुलगुरू मा.डॉ. एन.जे.पवार यांनी विद्यापीठाची माहिती दिली . विश्वस्त मा. डॉ.स्मिता जाधव यांनी आभार मानले .

कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. साफिया फारुकी (डायरेक्टर ऑफ डिस्टन्स लर्निंग ) यांनी केले.

या विशेष योग वेब कॉन्फरन्स चा लाभ ६७००० पेक्षा जास्त  दर्शकांनी झूम , वेब लाईव्ह ,फेस  बुक लाईव्ह  इ  माध्यमांद्वारे घेतला

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button