breaking-newsआंतरराष्टीय

येमेनमध्ये बेटावर अडकलेल्या ३८ भारतीयांची सुटका

नवी दिल्ली : आखाती देशांमध्ये एका बेटावर अडकलेल्या ३८ भारतीय नागरिकांना वाचवण्यात भारतीय नौदलाला यश आले आहे. चक्रीवादळामुळे हे नागरिक येमेनमध्ये अडकले होते. दरम्यान, हे सर्व भारतीय सुखरूप असून सर्वांची काळजी घेतली जात असल्याचा संदेश नौदलाने भारत सरकारला पाठवला आहे. याचा व्हिडीओदेखील ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

अरबी सागरामध्ये गेल्या आठवड्यात आलेल्या ‘मेकूनु’ या चक्रीवादळामुळे येमेनजवळील सोकोट्रा बेटावर एकूण ३८ भारतीय नागरिक अडकले होते. याची माहिती मिळाल्यानंतर या नागरिकांना वाचवण्याचे आदेश केंद्र सरकारने नौदलाला दिले. यानंतर नौदलाने ‘मिशन निस्तार’ची घोषणा करत ‘आयएनएस सुनयना’ या युद्धनौकेला या कामगिरीवर पाठवले. भारतीय नौदलाने ही कामगिरी यशस्वी पार पाडली.

 

SpokespersonNavy

@indiannavy

Evacuation of 38 Indian seafarers off Socotra by INS Sunayna 3/4 pic.twitter.com/IZ4qE2dFrm

SpokespersonNavy

@indiannavy

Evacuation of 38 Indian seafarers off Socotra by INS Sunayna 4/4 pic.twitter.com/83Ofk9bKN8

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button