breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मनसेच्या नवनियुक्त पदाधिका-यांवर पक्षवाढीची धुरा

पिंपरी / महाईन्यूज

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष पिंपरी-चिंचवड शहरातील नवनिर्वाचित विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष यांचा शहराध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गटनेते सचिन चिखले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सुशिल सोनकांबळे – विभाग अध्यक्ष (पिंपरी विधानसभा), निलेश कांबळे  – उपविभाग अध्यक्ष (पिंपरी विधानसभा), महेंद्र निशीगंध –  उपविभाग अध्यक्ष (पिंपरी विधानसभा), शिशिर महाबळेश्वकर – उपविभाग अध्यक्ष (पिंपरी विधानसभा), युवराज शिंदे – प्रभाग अध्यक्ष (पिंपरी विधानसभा), संजय मोरे – प्रभाग अध्यक्ष (पिंपरी विधानसभा), विवेक नेरलेकर – उपविभाग अध्यक्ष (चिंचवड विधानसभा), अनिल दहिभाते – प्रभाग अध्यक्ष (चिंचवड विधानसभा), संजय पंडित – प्रभाग अध्यक्ष (चिंचवड विधानसभा),  राजेश येवते – प्रभाग अध्यक्ष (चिंचवड विधानसभा) यांचा चिखले यांनी यथोचित सन्मान केला.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची संघठन बळकट करण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या विभागनिहाय निवडी जाहीर करून सबंधीत भागातील इच्छुकांवर जबाबदारी सोपविण्यात येत आहे. आगामी पालिका निवडणुकीत आपल्याला ताकदीने उतरण्यासाठी आतापासूनच कामाला लागण्याची गरज आहे, अशा सूचना त्यांनी नवनियुक्त पदाधिका-यांना दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button