TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

यूपीमध्ये पंचायत निवडणुकीत शिवसेनेची एन्ट्री

शिवसेना यूपीमध्ये पंचायत निवडणुका लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सेमीफायनल मानल्या जाणार्‍या पंचायत निवडणुका मार्च-एप्रिलमध्ये होणार आहेत. याआधी उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या पंचायत निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) आणि अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) पक्षाने आपले उमेदवार उतरवले होते. आता शिवसेनाही आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे.

शिवसेनेचे उत्तर प्रदेश प्रदेश प्रमुख अनिल सिंह म्हणाले की, पंचायत निवडणुकीसाठी जिल्हावार आढावा घेऊन पक्षाच्या वतीने प्रभारी नियुक्त केला जात आहे. सर्व जिल्ह्यांमधून अर्ज मागविण्यात येत आहेत. याशिवाय शिवसेनेचे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील संघटनेच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन त्यांना निवडणुकीच्या तयारीविषयी माहिती देणार आहे.

वाचाः व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिन सावधान, गुन्हा दाखल होईल; 1 जानेवारी कोरेगाव भीमा मानवंदना

अनिल सिंह म्हणाले की, आमचे संघटन संपूर्ण राज्यात चांगलं काम करीत आहे. मागील निवडणुकीत 16 जिल्हा पंचायत सदस्य आणि 150 हून अधिक प्रधान निवडले गेले होते. काँग्रेससोबत युती करुन पंचायत निवडणुका लढवण्यासाठी महाराष्ट्रातील शिवसेना खासदार अरविंद सावंत 16 जानेवारीला राज्यात येणार आहे. त्यांच्यासमवेत बैठक आयोजित केली जाईल. महाराष्ट्रात आमची युती आहे. येथे देखील असू शकते. त्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. उर्वरित बैठकीत निर्णय होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button