breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुंबईत येणार १ हजार मेगावॉट हरित ऊर्जा प्रकल्प

मुंबई |

मुंबईला लवकरच १ हजार मेगावॉट हरित ऊर्जा मिळणार आहे. सध्या पुरवठा होत असलेल्या औष्णिक विजेला हा पर्याय असेल. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने (एईएमएल) या संदर्भात याचिका दाखल केली आहे. एईएमएल ही मुंबईतील सर्वाधिक ग्राहकांना वीज वितरण करणारी कंपनी आहे. कंपनी जवळपास ३० लाख ग्राहकांना विजेचा पुरवठा करते. त्यासाठी प्रामुख्याने डहाणूच्या औष्णिक वीज प्रकल्पातून वीज खरेदी केली जाणार आहे. या विजेला पर्याय म्हणून १ हजार मेगावॉट हरित ऊर्जा खरेदी करण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका एईएमएलने वीज नियामक आयोगात केली आहे.

राज्यातील सर्व प्रकारच्या हरित ऊर्जा स्रोतांसाठी पुण्यात मुख्यालय असलेली महाराष्ट्र ऊर्जा अभिसरण संस्थेची (मेडा) भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळेच ‘मेडा’ हे या याचिकेत प्रतिवादी आहेत. परंतु ‘मेडा’ने याबाबत म्हणणे मांडण्यासाठी अतिरिक्त कालावधी मागितला आहे. त्यानुसार ‘मेडा’चे म्हणणे मांडून होईपर्यंत एईएमएलने हरित ऊर्जेचे किती लक्ष्य गाठले गेले, त्यात किती तूट आहे, सध्याच्या हरित ऊर्जा करारांची स्थिती, भविष्यात होणारे करार तसेच या १ हजार मेगावॉट हरित ऊर्जा खरेदीसाठी नेमका दर कसा असेल, या सर्वांचा अभ्यास पुढील सुनावणीपर्यंत मांडावा, अशी सूचना आयोगाने एईएमएलला दिली आहे.

  • कोळशावरची वीजखरेदी टळणार

१ हजार मेगावॉट हरित ऊर्जा खरेदी कराराला मंजुरी दिल्यानंतर डहाणू येथून कोळशावर आधारित वीजखरेदी करावी लागणार नाही. त्यावेळी आरे-कुडूस आणि खारघर-विक्रोळी पारेषण वाहिन्याही उभ्या होत आहेत. त्याद्वारे अतिरिक्त वीज मुंबईत येईल. अशाप्रकारे २०२४पर्यंत मुंबईसाठी बाहेरून वीज आणण्याची गरज भासणार नाही, असे एईएमएलने याचिकेत म्हटले आहे.

  • पर्यावरणानुकूल हरित ऊर्जा

ऊर्जा ही पारंपरिक व अपारंपरिक (नुतनीय) प्रकारची असते. पारंपरिक प्रकारात कोळसा, जलविद्युत किंवा डिझेल जनरेटर यांचा समावेश होतो. तर अपारंपरिक किंवा नुतनीय प्रकारात सौर आणि पवन उर्जेचा समावेश होतो. नूतनीय ऊर्जा स्रोत प्रदूषणमुक्त असतात. यामुळेच त्याला हरित ऊर्जा म्हटले जाते. तसेच हे स्रोत कधीही न आटणारे असतात. त्यामुळेच या विजेला ‘अक्षय ऊर्जा’ही संबोधले जातात. पर्यावरणानुकूल अशीही ऊर्जा असते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button