breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

यूजीसी–नेट परीक्षा 24 सप्टेंबरला

नवी दिल्ली – राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) वतीने घेण्यात येणारी यूजीसी-नेट परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ती आता 24 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील माहिती लवकरच एनटीएच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात येणार आहे.

सुरुवातीला ही परीक्षा 16 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालाकधीत घेण्यात येणार होती. परंतु त्याच कालावधीत आयसीएआरच्या परीक्षा आहेत. अनेक विद्यार्थी आयसीएआर तसेच नेट अशा दोन्ही परीक्षांना बसले आहेत. त्यांच्या सोयीसाठीच नेट परीक्षा पुढे ढकलण्यात आली. वेळापत्रकासाठी विद्यार्थ्यांनी एनटीए तसेच यूजीसी-नेटच्या अधिकृत वेबसाईटकरून माहिती घेत रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. सहाय्यक प्राध्यापक किंवा कनिष्ठ संशोधक या पदांसाठी यूजीसी-नेट परीक्षा घेतली जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button