breaking-newsक्रिडा

‘या’ स्पर्धेत ५३६ खेळाडूंमध्ये इरफान पठाण एकमेव भारतीय खेळाडू

IPL चा बारावा हंगाम नुकताच संपला. आता साऱ्या क्रिकेटप्रेमींना ३० मे पासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेध लागले आहेत. या स्पर्धेसाठी भारताचा १५ खेळाडूंचा संघ जाहीर झाला असून विराट कोहलीकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. या बरोबरच सध्या एका वेगळ्या स्पर्धेमुळे इरफान पठाण या नावाची चर्चादेखील रंगली आहे. ती स्पर्धा म्हणजे विंडीजमधील Caribbean Premier League 2019.. या स्पर्धेसाठी काढण्यात आलेल्या खेळाडूंच्या ड्राफ्टमध्ये ५३६ खेळाडूंमध्ये भारताचा केवळ एकमेव इरफान पठाण या खेळाडूची वर्णी लागली आहे.

इरफान पठाण हा Caribbean Premier League 2019 या स्पर्धेत खेळणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू ठरणार आहे. लंडनमध्ये २२ मे रोजी या ड्राफ्टमधील खेळाडूंचे संघ ठरणार आहेत. या स्पर्धेसाठी २० विविध देशांतील एकूण ५३६ खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला आहे. इरफान पठाणसह अलेक्स हेल्स, रशीद खान, शाकिब अल हसन, जोफ्रा आर्चर हे खेळाडूदेखील या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. त्याचबरोबरच विंडीजमधील ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, आंद्रे रसल, सुनील नरिन, कायरन पोलार्ड आणि जेसन होल्डर हे खेळाडूदेखील त्यांची फटकेबाजी दाखवून देणार आहेत. या स्पर्धेत एकूण ६ संघ आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button