breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

या वर्षात भारताचा वृद्धी दर 5 टक्क्यांपेक्षा जास्त राहील, 2020-21 मध्ये 6 टक्क्यांपेक्षा जास्त : संयुक्त राष्ट्र

नवी दिल्ली | संयुक्त राष्ट्रा (यूएन)नेही २०१९-२० साठी भारताच्या विकास दराचा अंदाज १.९% घटवला आहे. त्यांनी देशाची अर्थव्यवस्था ५.७% दराने वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. यासोबत यूएनने पुढील आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ६.६% राहण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या वर्षी यूएनने आर्थिक वर्ष २०१९-२० साठी जीडीपी विकास दर ७.६% जाहीर केला होता. याआधी अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत संस्थांनी भारताच्या वृद्धीचा अंदाज घटवला आहे.

यूएन अशी सातवी संस्था आहे, जिने भारताच्या विकास दराच्या अंदाजात कपात केली आहे. याआधी वर्ल्ड बँक, एसबीआय, एडीबी, मूडीज, एसबीआय आणि फिचनेही वृद्धीचा अंदाज कमी केला होता. असे असले तरी यूएनचा अंदाज सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या ५% च्या अंदाजामुळे ०.७% अधिक आहे. २०१८-१९ मध्ये भारताचा विकास दर ६.८% राहिला होता.

  • जागतिक विकास दर २.५% होण्याचा अंदाज

सकल राष्ट्रीय उत्पादना(जीडीपी)तील घसरणीमागची प्रमुख तीन कारणे

  • ऑटो सेक्टर: या क्षेत्रात गेल्या वर्षी मंदी राहिली. गाड्यांच्या विक्रीत १९ वर्षांत सर्वात तेजीने घसरण नोंदली. देशाच्या जीडीपीत ऑटो उद्योगाचा ७% वमॅन्युफॅक्चरिंग जीडीपीत ४९% शेअर्स आहेत.
  • आयआयपी: सप्टेंबरमध्ये कंपनी करात कपातीसारखे पाऊल उचलल्यावर मरगळ आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबरमध्ये आयआयपी १.८% वाढला.
  • एनबीएफसी:नॉन बँकिंग फाय. कंपन्यां(एनबीएफसी)चे रोकड संकट हे जीडीपी घसरणीचे कारण आहे.
  • चीनचा वृद्धी दर ६.१%, २९ वर्षांत सर्वात कमी
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button