breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

NIRBHAYA CASE : “असा गुन्हा करण्याचा विचारही कोणी करता कामा नये अशी भिती निर्माण करायची असेल तर…”

निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व दोषींना आज (शुक्रवार) पहाटे ५.३० वाजता तिहार तुरुंगामध्ये फासावर लटकवण्यात आलं. निर्भया प्रकरणातील दोषींना फासावर लटवण्यात आल्यानंतर इंटरनेटवर अनेकांनी निर्भयाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे. अभिनेता रितेश देशमुख यानेही ट्विटवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रितेशने ट्विट करताना #JusticeForNirbhaya हा हॅशटॅग वापरत निर्भयाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे. “माझ्या सद्भावना निर्भयाचे पालक, मित्र आणि नातेवाईकांबरोबर आहेत. बराच वेल वाट पहावी लागली पण अखेर न्याय मिळाला,” असं ट्विट रितेशने केलं आहे. तसेच दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने न्यायव्यवस्थेसंदर्भात भाष्य केलं आहे. “अशाप्रकारचा भयंकर गुन्हा करणाऱ्याचा विचारही कोणाच्या मनात येऊन नये अशी भिती निर्माण करायची असल्यास कायदे कठोर करणं गरजेचं आहे. कठोर शिक्षा, जलद गतीने होणारा न्यायनिवाडा हेच असे गुन्हे थांबवण्याचा मार्ग आहे,” असं रितेशने म्हटलं आहे.

आज सकाळी साडेपाच वाजता मुकेश सिंग (३२), पवन गुप्ता (२५), विनय शर्मा (२६) आणि अक्षय कुमार सिंग (३१) या चारही आरोपांनी तिहार तुरुंगामध्ये फासावर लटवण्यात आलं. डिसेंबर २०१२ मध्ये घडलेल्या निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. प्रकरणानंतर संतापाची एक लाट देशभरात उसळली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button