आरोग्य

‘या’ उपायाने होईल केसातील चिकटपणा दूर..

अनेकजणांना दररोज शाँम्पू करण्याची सवय असते. परंतु असे केल्याने देखील काही जणांना केस चिकट होण्याची समस्या जाणवते.शाँम्पू केल्यावर देखील त्यांचे केस चिकट होतात आणि गुंततात. तुम्हाला देखील ही समस्या असेल तर तुम्ही किचनमधील काही गोष्टींची मदत घेऊन केसांचा चिकटपणा दूर करू शकता.त्यासाठी पुढील कृती बघा..

साहित्य :-
* २ ग्रीन टी बॅग
* ५ पुदीन्याची पाने
* ५०० एमएल पाणी
*एका लिंबाचा रस

Hair

असा करा तयार :- ग्रीन टी च्या दोन बॅग, ५ पुदीन्याची पाने ५०० एमएल पाण्यात उकडून घ्या. आता यात लिंबाचा रस मिश्रित करा. हे मिश्रण गाळून एका भांड्यात काढा. आता या मिश्रणाने केस आणि खासकरुन डोक्याची त्वचा धुवा. याने केसांना चिकटलेलं ऑइल आणि डोक्याच्या त्वचेचं ऑइल निघून जाईल. यात उपयोग केलेला लिंबूमध्ये एक नैसर्गिक एस्ट्रीजेंट आहे, जे तुमच्या डोक्याच्या त्वचेवरुन ऑइल दूर करण्याचं काम करतात. सोबतच ग्रीन टी आणि पुदीन्यामुळे तुमचे केस नरिश होतात. तसेच केसांची अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-फंगल गुणांमुळे इन्फेक्शनपासून बचाव केला जातो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button