breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

यांत्रिकी पध्दतीने रस्त्यांची साफसफाई निविदेत रिंग; आयुक्तांसह संबंधित अधिका-यांच्या चाैकशीची मागणी

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र; शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांची मागणी

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी – चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्यात येणार आहे. त्या कामाची सुमारे 647 कोटींची निविदा काढली आहे. ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून नियम व अटी टाकण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय पातळीवर निविदा प्रसिध्दीकरुन आठच ठेकेदार सहभागी झाले आहेत. या कामात आयुक्तांसह आरोग्य कार्यकारी अधिका-यांने ठेकेदाराच्या फायद्यासाठी निविदेतील काही अटी रद्द केल्या असून सर्व ठेकेदार एकमेकांना सहाय्य करीत निविदा आदलून-बदलून भरत आहेत. त्यामुळे आयुक्तासह संबंधित अधिका-यांची चाैकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे यांनी केली.

राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देवून ही मागणी केली आहे. त्यात म्हटले आहे की, या निविदेमुळे पिंपरी चिंचवड शहरातील अनेक कामगार बेरोजगार होणार आहेत. त्याच्या कुटूंबियाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आयुक्तांना ही निविदा रद्द करुन प्रभागनिहाय निविदा राबविण्याचे सुचविले आहे.निविदेत निकोप स्पर्धा होवून सर्वांना निविदा भरता येतील. त्याकरिता महापालिकेने साफसफाईच्या अत्याधूनिक 51 गाड्या स्वता: खरेदी केल्यास 20 ते 25 कोटी लागतील.

दरम्यान, सदरील निविदा सात ते आठ वर्षाची काढण्याचा नेमका हेतू काय आहे. आठ प्रभाग एक एकत्र करुन निविदा फूगवून जास्त दर आयुक्तांनी दाखविला आहे. हा दिवसा ढवळ्या पालिकेच्या तिजोरीवर दरोडा दिसत आहे. त्यामुळे आपण व्यक्तींशा लक्ष घालून आयुक्त श्रावण हर्डिकर व मुख्य आरोग्य कार्यकारी अधिकारी डाॅ. के. अनिल राॅय व आरोग्य कार्यकारी अधिकारी डाॅ. लक्ष्मण गोफणे यांची चाैकशी करावी, अशी मागणी उबाळे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button