breaking-newsपिंपरी / चिंचवड
‘यशस्वी’ संस्थेच्या वतीने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने साजरी करण्यात आली.
यावेळी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाल की, महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचे कार्य व विचार सर्वांसाठी मार्गदर्शक आहेत. यावेळी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या अधिष्ठाता डॉ. सुनिता पाटील, संस्थेच्या मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापिका मनीषा खोमणे यांच्यासह मोजक्याच संख्येने अध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. महेश महांकाळ यांनी केले.