breaking-newsआंतरराष्टीय

चीनमधील 80 टक्‍के मुलांमध्ये दृष्टिदोष – आरोग्य विभागाचा अहवाल

बीजिंग (चीन) – चीनमधील 80 टक्के मुलांमध्ये दृष्टिदोष असल्याचे आरोग्य विभागाच्या एका अहवालात दिसून आले आहे. चीनच्या एकूण लोकसंख्यपैकी 33 टक्के लोकसंख्येला म्हणजे 45 कोटी व्यक्तींना ऱ्हस्व दृष्टिदोष (मायोपिया) असल्याचे आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत दिसून आले आहे. यात 19 वर्षांखालील मुलांची संख्या फार मोठी आहे, सुमारे 80 टक्के युवावर्गामध्ये ऱ्हस्व दृष्टिदोष असल्याचे दिसून आलेले आहे.

चीनमधील 60 कोटी व्यक्तींना ऱ्हस्व दृष्तिदोष असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण महाप्रचंड आहे. 70 टक्के माध्यमिक विद्यार्थ्यांमध्ये, 13 ते 19 या वयोगटातील 60 ते 80 टक्के मुलांमध्ये, तर कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या सुमारे 90 टक्के व्यक्तींमध्ये ऱ्हस्व दृष्टिदोष असल्याची माहिती पेकिंग युनियन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे तज्ज्ञ लॉंग क्विन यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button