breaking-newsराष्ट्रिय

…म्हणून त्याने विमानात बॉम्ब असल्याची पसरवली अफवा

नवी दिल्ली | महाईन्यूज

प्रवास करताना वेळ पाळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. उशीर झाल्यामुळे अनेकदा खूप जणांची ट्रेन, बस जाते अथवा विमान सुटतं. मात्र आपल्या आईला विमानतळावर पोहोचण्यास उशीर होईल म्हणून एका तरुणाने चक्क विमानात बॉम्ब आहे अशी अफवा पसरवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बॉम्ब असल्याचा फोन येताच विमानतळावर एकच खळबळ उडाली. मात्र तपासानंतर ही एक अफवा असल्याचं समोर आलेलं आहे.

एका तरुणाने एअरलाईन्सच्या कस्टमर केअरवर फोन करून विमानात बॉम्ब असल्याचं सांगितलं. तरुणाच्या आईला विमान प्रवास करायचा होता. मात्र काही कारणांमुळे त्यांना विमानतळावर पोहचण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे विमान सुटण्याची शक्यता होती. मात्र आईचं विमान सुटू नये यासाठी तरुणाने विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरवली. त्याने फोनकरून विमानतळावर याची माहिती दिली. त्यामुळे विमानाची तपासणी करण्यात आली. मात्र त्यामध्ये काहीच संशयास्पद आढळून आलेले नाही. विमानात बॉम्ब न आढल्यामुळे याप्रकरणी त्या फोनसंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (3 फेब्रुवारी) संध्याकाळी 7.38 वाजता इंडिगो एअरलाईन्सच्या कस्टमर केअरवर एक फोन आला ज्यामध्ये मुंबईला जाणाऱ्या 6E-843 विमानात बॉम्ब असून ते विमान टी-1 वरून उड्डाण करणार असल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी एजन्सीच्या मदतीने तपासणी केली असता बॉम्ब अथवा इतर काही संशयास्पद आढळले नाही. सर्व गोष्टी ठीक होत्या. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button